पहिल्या पंचवार्षिक योजनेत आली विकासगंगा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जानेवारी २०२१

पहिल्या पंचवार्षिक योजनेत आली विकासगंगा

ओळख कर्तृत्वाची !! 3 !!

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
साधारणपणे हातात सत्ता आली की लोक आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू दादासाहेब कन्नमवार याला अपवाद होते. हातात सत्ता आली की, ती सत्कारणी कशी लावावी, पैसा आला की त्याचा जनकल्यानार्थ उपयोग करून आपला प्रदेश अधिक संपन्न करावा ही कला त्यांना उत्क्रुष्ट साधली होती व त्याचा त्यांनी चांगल्या रितीने उपयोग केला.हे त्यांच्या पुढील कार्यकर्त्रूत्वावरून लक्षात येईल.

*पहीली पंचवार्षिक योजना ते तिसरी पंचवार्षिक योजना या काळात दादासाहेब कन्नमवार, आरोग्यमंत्री, बांधकाममंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अश्या पदावर होते, कन्नमवारांनी जनकल्यानार्थ विविध क्षेत्रातील भरपूर कामे केली. त्या कार्यात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हाकरिता त्यांनी केलेल्या कार्याची माहिती पुढील प्रमाणे.
पहिल्या पंचवार्षिक योजनेत चंद्रपूर पाणीपुरवठा योजना एकवीस लाख रुपये, खेडे विभाग पाणी पुरवठा योजना अकरा लाख रुपये ,खांबाडा नदीवरील पूल साडे आठ लाख रुपये, आणि इरई नदीवरील पूल आठ लाख रुपये याप्रमाणे प्रमाणे पूर्ण केले. यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्याकरीता वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा पूल, तसेच बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील पूल त्यांनी प्राथमिकता देऊन पूर्ण केला.जिल्यात जास्तीत जास्त प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक तयार करण्याकरिता चंद्रपूरला सात लाख रुपये खर्च करून प्रशिक्षणालय उभे केले. तसेच चंद्रपूर येथील जनता महाविध्यालयास मदत केली. ज्युबिली हायस्कूल मल्टीपरपज इमारतीवर अडीच लाख रुपये आणी गडचिरोली येथील हायस्कूल इमारतीवर साडेतीन लाख रुपये खर्च केले.

चंद्रपूर येथील अन्नधान्याचे गोदाम अडीच लाख रुपये, मूल येथील गोडाऊन सत्तर हजार आणि वडसा येथील गोदामावर दोन लाख रुपये खर्च केले. चंद्रपूर टी.बी वार्डाकरिता दीड लाख रुपये, प्रसूतीग्रूहाच्या इमारतीकरीता पंधरा हजार रुपये, गोवर्धन येथील दवाखान्याकरिता वीस हजार रुपये, तसेच मूलच्या दवाखान्यावर काही रक्कम खर्च केली. चंद्रपूर राष्ट्रीय विस्तार खंडा साठी साडेचार लाख रुपये, चामोर्शी, सिंदेवाही, गडचिरोली, अहेरी, राष्ट्रीय विस्तार खंड अठरा लाख रुपये, मूल व भद्रावती सामूहीक योजना खंड तीस लाख रुपये व बल्लारपूर येथील खापरखेडा उपवीज केंद्रावर ऐंशी लाख रुपये खर्च केले.

याखेरीज मूल-मारोडा, चिखलगांव, नवरगांव, ब्रम्हपुरी-वडसा, भंगाराम-तळोधी, धाबा, व्याहाड, कोंढा, शेगांव, नेरी, अंकीसा, आल्लापल्ली, सिरोंचा, पोंभूर्णा व टेंपा- चिमूर रोड यावर पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आले. पळसगाव नाला, बेलघाट नाला, नागभीड, राजोली अकरा लाख रुपये, किन्ही तलाव सुधारणा दीड लाख रुपये इ.

कन्नमवारांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत* भद्रावती, गोवर्धन, नागभीड, वडसा, नवरगाव, येथे अँलोपॅथी दवाखान्याची व्यवस्था केली तर लोंढोली, व्याहाड, चामोर्शी, चिंचोली, कोठारी, बेंबाळ, पाथरी, अंकीसा, तळोधी, चोरा, कोसरसार, माढेळी, आसरली येथे आयुर्वेदिक दवाखान्यावर लाखो रुपयांचा विकास कार्य केले. दिना नदीवरील दीड कोटीचे धरण, माढेळी, वरोरा, गोंडपिंपरी, धानोरा-मुरूमगाव, इ. वर तीस लाख रुपये तसेच आलेवाही पंच्याऐंशी हजार रुपये, ओलभूज एक लाख पंच्याऐंशी हजार, निंबाळा दोन लख ऐंशी हजार आणी मरेगाव दहा हजार रुपये इत्यादी कार्य केले.

*तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतही* दादासाहेब कन्नमवारांनी अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली. पैसा पैसा प्रांतीय सरकारकडुन असो की केंद्रीय सरकारकडुन असो, मिळेल असेल तेथून तो मिळवायचा व जेथे गरज आहे तेथे जनकल्यानार्थ उपयोगात आणावयाचा हेच त्यांचे धोरण होते.

जंगलात उपेक्षित ताडोबा सरोवरा लगतचे वन यांचे प्रसिध्द ताडोबा उद्यान बनविले. उमरेडला कोळशा खाणीचे उद्घाटन केले. वैनगंगा नदीचा तीरावर असलेल्या प्रसिद्ध मार्कंडा या तीर्थक्षेत्री शुद्ध पाणी, नळ योजना, वीज पुरवठा उपलब्ध करून दिला. आष्टी येथे वैनगंगेवर 1725 पुट लांबीचा पूल, असे अनेक लोकोपयोगी कार्य दादासाहेब कन्नमवारांनी केली.


*खिमेश बढिये* (नागपूर)
प्रचारक
*दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर*
8888422662, 9423640394