राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी खेळाला क्रिकेट सामना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जानेवारी २०२१

राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी खेळाला क्रिकेट सामना

ओळख कर्तृत्वाची- भाग 5

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
20 नोव्हेंबर 1962 रोजी सकाळी 9 वाजता राजभवनातील जलनायक या इमारतीसमोर महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल न्यायमूर्ती चैनानी यांच्याकडुन महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. सर्वात प्रथम न्या. चैनानी यांनी शुद्ध मराठी भाषेत नवे मुख्यमंत्री मारोतराव सांबशीव कन्नमवार यांना मुख्यमंत्रीपदाची व गुप्ततेची शपथ दिली.

मुख्यमंत्री पदावर येताच दादासाहेब कन्नमवारांनी राष्ट्रीय संरक्षणनिधीकरीता भरभक्कम आघाडी उभारली. प्रत्येक मंत्री- उपमंत्र्याकडे जिल्हाची जबाबदारी विभागून दिली. केंद्राकडून तसेच आपल्या राष्ट्रीय नेत्याकडून येणारा प्रत्येक आदेश कार्यान्वित करून कोट्यावधी रुपयांचा निधी व सोने गोळा केले. त्याकरीता त्यांनी तुफानी दौरे केले.* तसेच विविध कार्यक्रम घेतले.त्यापैकी मुख्य 1) जनसंपर्कातून प्रचंड निधी, 2) सहामाही कार्यक्रम, 3) क्रिकेट मॅच , 4) श्रमदान सप्ताह, 5) " हमारा हिमालय प्रदर्शन", 6) व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम इत्यादी होत.

*दादासाहेब कन्नमवार लहानपणापासूनच क्रिकेटचे शौकीन होते.* लहानपणी ते आईसोबत जंगलात जाऊन लाकडे तोडून आणीत व त्याच्या बॅटस बनवीत, वयाच्या 64 व्या वर्षी त्यांना पुन्हा देशाच्या संरक्षणासाठी बॅट हातात घेण्याची इच्छा झाली. 17 मार्च 1963 ला मुंबई येथे बॉम्बे जिमखाना मैदानावर मुख्यमंत्री संघ व महापौर संघ यांच्यात क्रिकेटचा सामना झाला. *या सामनाद्वारे 25 लाखावर निधी गोळा झाला*. त्यावेळी मंत्री संघाच्या वतीने मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी तर महापौर संघाचे वतीने महापौर एम.एन.शाह यांनी संघाचे नेत्रुत्व केले. देशाच्या संरक्षण निधी करीता क्रिकेट खेळणारा भारतातील एकमेव मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होते.


- खिमेश बढिये (नागपूर)
प्रचारक
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394