जिल्ह्यात अनेक दिवसानंतर नवीन कोरोना बाधीतांची संख्या दहाच्या आत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



१६ जानेवारी २०२१

जिल्ह्यात अनेक दिवसानंतर नवीन कोरोना बाधीतांची संख्या दहाच्या आत

जिल्ह्यात अनेक दिवसानंतर नवीन कोरोना बाधीतांची संख्या दहाच्या आत




गत 24 तासात नऊ पॉझिटिव्ह

13 कोरोनामुक्त ; एक मृत्यू

Ø आतापर्यंत 22,165 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 282

 

चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 9 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 828 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 165 झाली आहे. सध्या 282 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 88 हजार 982 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 64 हजार 407 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यांमध्ये भद्रावती येथील 28 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 381 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 346, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या नऊ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील पाच, सिंदेवाही एक, पोंभुर्णा एक, व वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.