आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती आली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जानेवारी २०२१

आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती आलीओळख कर्तृत्वाची


कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 7 !!

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळातही दादासाहेब कन्नमवारांचा समावेश करण्यात आला. ह्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते तसेच दळणवळण, बांधकाम हे खाते सोपविण्यात आले. अश्याप्रकारे दादासाहेब कन्नमवार महाराष्ट्र राज्याचे पहीले उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर चीनने युध्दघोषणा न करताच भारतावर आक्रमण केले. तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात बोलावून संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आणि दादासाहेब कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री) झाले.

20 नोव्हेंबर 1962 रोजी सकाळी 9 वाजता राजभवनातील जलनायक या इमारतीसमोर महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल न्यायमूर्ती चैनानी यांच्याकडून महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. सर्वात प्रथम न्या. चैनानी यांनी शुद्ध मराठी भाषेत नवे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांना मुख्यमंत्री पदाची व गुप्ततेची शपथ दिली.


खिमेश मारोतराव बढिये
(नागपूर - प्रचारक)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394