स्टंटबाजी करणारा "तो" तरुण अखेर सापडला ! वाचा कोण आहे तरुण? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२१

स्टंटबाजी करणारा "तो" तरुण अखेर सापडला ! वाचा कोण आहे तरुण?

चंद्रपूर -शहरातील मध्यवर्ती बँके समोर बाईक स्टंट करणाऱ्या युवकाचा बाईकवरील ताबा सुटला आणि त्याने अन्य वाहनचालकाला धडक दिली. या धडकेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. मात्र, या जखमी वाहनचालकाला सोडून स्टंट करणारा युवक त्याला सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. वाहनचालक गंभीर जखमीला मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दोन दिवसांनी हा तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे.


26 जानेवारी असल्यामुळे गणतंत्र दिवशी देशभक्तीचा ऊत आला होता. अनेक टोळके शहरात भरधाव गाड्यांवर फिरत होते आणि त्यामुळे या स्टंट बायकर्सचा धुमाकूळ पाहण्यासारखा होता. त्यातच शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर असलेल्या CDCC बँकेसमोर एका बाईकरचा स्टंट करताना तोल गेला आणि रस्त्याने जाणाऱ्या 34 वर्षीय हरदीप साहनी या तरुणाला त्याची धडक बसली. या धडकेमुळे हरदीपच्या डोक्याला जबर मार बसला असून, त्याला चंद्रपूर शहरातल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यावर या आरोपी बाईकरने तिथे थांबून जखमी व्यक्तीची मदत करण्याचे देखील सौजन्य दाखवले नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी बायकरचा स्टंट चित्रित करणाऱ्या सहकाऱ्यांनी ही घटना रेकॉर्ड करत चक्क व्हायरल केली आहे. जखमी अवस्थेतील वाहनचालकाला सोडून स्टंट बायकरने पळ काढतानाची दृश्ये देखील यात रेकॉर्ड झाली आहेत. अब्दुल या स्टंट बायकरचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. स्टंटबाजीतील मास्टर उध्दव ताककोंङावार आणि अब्दूल याला ताब्यात घेण्यात आले.