चंद्रपुरात बंदूक दाखवत फिरत होता युवक:पोलिसांनी विचारपूस केल्यावर निघाली नकली बंदूक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ जानेवारी २०२१

चंद्रपुरात बंदूक दाखवत फिरत होता युवक:पोलिसांनी विचारपूस केल्यावर निघाली नकली बंदूकचंद्रपूर/खबरबात:
शहरातील वरोरा नका चौकात एक युवक आपल्या मित्रांसोबत बसला असतांना नकली बंदूक दाखवत परिसरात वातावरण तापविण्याचा प्रयत्न करीत असतांना पकडल्या गेला. चंद्रपूर शहरामधील वर्दळीच्या ठिकाणी वरोरा नाका चौकात मित्र मंडळींसोबत एक तरुण फिल्मी स्टाईलने गाडीतून उतरला व त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन चार तरुणांना आपल्या कंबरे मध्ये असलेली बन्दुक काढून दम देण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याचवेळी तिथून युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. सूरज ठाकरे व त्यांच्यासोबत निखील बजाज व राहुल चव्हाण हे जात असताना त्यांनी हा प्रकार बघितला व तात्काळ बंदूक असलेल्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली व त्या तरुणाला पकडले व लगेच रामनगर पोलिस स्टेशन ला सूचना दिली. दहा ते पंधरा मिनिटाच्या आत मध्ये पोलिसांचा ताफा याठिकाणी आला व सदर तरुण व त्यासोबत वाद घालत असलेला तरुण याला व त्याच्या जवळ असलेल्या बंदूकिला घेऊन पोलिस स्टेशनला पुढील तपासा करता घेऊन गेले.मात्र ती बंदूक नकली निघाल्याने चांगलाच हासा झाला.