प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२१

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून
महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई : भारत सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहाजणांचा समावेश असून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण या मान्यवरांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारत सरकारने राज्यातील रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे आणि जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. सिंधूताई सपकाळ यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा सन्मान सरकारने केला आहे. नामदेव कांबळे यांचे साहित्यातील योगदान भारत सरकारकडून गौरविण्यात आहे. परशुराम गंगावणे यांच्या कला टिकविण्यासाठीच्या आगळ्या कामाचाही गौरव सरकारने केलेला आहे. भाजपा, महाराष्ट्रतर्फे आपण या सर्वांचे अभिनंदन करतो.