नेरूळ सेक्टर २० व २०अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा : विरेंद्र म्हात्रे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जानेवारी २०२१

नेरूळ सेक्टर २० व २०अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा : विरेंद्र म्हात्रे

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० व २०अ तसेच नेरुळगांव नोडमध्ये मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ पालिका विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ९३ व ९५ मध्ये नेरूळ सेक्टर २० व २०अ तसेच नेरुळ गांध नोडचा समावेश होतो. या ठिकाणी कोठेही बाह्य वर्दळींच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही पहावयास मिळत नाही. नेरूळ सेक्टर विसमधील तेरणा हास्पिटल ते नेरुळ सेक्टर विसमधील तलाव यादरम्यान सकाळी व रात्री मोठ्या संख्येने मॉर्निग वॉकसाठी तसेच रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी येत असतात. नेरुळ रेल्वे स्टेशन परीसरात रात्रीच्या वेळी मार्केट भरतो त्या मार्केट मध्ये रात्रीच्या वेळी भाजी व ईतर वस्तू घेण्यासाठी नागरिकांनची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर वाहने विशेषत : दुचाकी सुसाट वेगाने जात असतात. अपघात झाल्यास सीसीटीव्ही नसल्याने काहीही अंदाज लागत नाही. अंर्तगत भागात वाटमारीच्याही घटना घडल्या आहेत. परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनाही झाल्यास आहेत. पोलिसांना आजही तपासात अडथळे येत असतात. या परिसरात अंर्तगत व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि गुन्हा – अपघात घडल्यास पोलिसांनाही तपासात सहकार्य मिळून शोध लवकर लावण्यास मदत होईल. कायदा व सुव्यवस्थेच्या उपयुक्ततेसाठी समस्येचे गांभीर्य पाहता आपण या ठिकाणी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी केली