नागपूर मेट्रो विद्यार्थ्यान करिता फायदेशीर : मेट्रो प्रवासी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२१

नागपूर मेट्रो विद्यार्थ्यान करिता फायदेशीर : मेट्रो प्रवासी


नागपूर मेट्रो विद्यार्थ्यान करिता फायदेशीर : मेट्रो प्रवासी


•कमी खर्चात कमी वेळात प्रवास करने शक्य : कॉलेज विद्यार्थी

नागपूर २०:ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे तसेच कोरोना नंतर हळू-हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असून शाळा व कॉलेजचे विद्यार्थी मेट्रोने प्रवास करीत आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर नवीन मेट्रो स्टेशन उपलब्ध झाल्याने मेट्रोचा प्रवास आणखी फायदेशीर ठरत आहे.

या पूर्वी इतर वाहतुकीच्या साधनाने कॉलेज पर्यंत प्रवास करत होती या साधनानमुळे वेळे वर पोहोचता येत नव्हते परंतु मेट्रो मुळे आता हा प्रवास शक्य झाला आहे.कॉलेज पर्यंतचा प्रवास वेळेमध्ये करता येते तसेच इतर वाहतुक साधनांच्या तुलनेत मेट्रोचा प्रवास कमी खर्चात होतो. स्टेशन परिसरात चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच सुरक्षित आहे. विद्यार्थी व नोकरी करणाऱ्यानी निश्चितच मेट्रोचा उपयोग करायला पाहिजे असे मत धरमपेठ तारकुंडे कॉलेजची विद्यार्थीने व्यक्त केले : कु. वैष्णवी ठाकूर (विद्यार्थी - धरमपेठ तारकुंडे कॉलेज)

लोकमान्य नगर ते शंकर नगर पर्यंत मेट्रोने प्रवास करत असून या पूर्वी ये जा करण्याकरिता ४० रु. खर्च व्हायचे जे कि,आता २० रु. शक्य झाले आहे. मेट्रोमुळे कमी खर्चात जाणे येणे होत असून वेळेची बचत देखील होते. साहिल नगराळे (कॉलेज विद्यार्थी)

नागपूर मेट्रो येथील सुविधा विद्यार्थ्यान करिता फायदेशीर असून वेळेवर मेट्रो उपलब्ध असते अन्य वाहतुकीच्या साधनाने प्रवास करतांना गर्दी व्हायची जे कि आता जाणवत नाही व सुखरूप प्रवास करता येणे शक्य होते. महिलांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असून मेट्रो व स्टेशन परिसर सीसीटीव्ही कॅमेरा ने सज्ज आहे. बसण्याकरिता जागा व तांत्रिक दृष्टया चांगली आहे. नागपूर शहरात मेट्रो उपलब्ध असल्याने विद्यार्थ्याना फायदेशीर आहे असे उदगार कॉलेज विद्यार्थीनी कु हर्षा प्रजापती ने व्यक्त केली.