डिसेंबर २०२१ मध्ये सीए रोड आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरु होणार : डॉ. ब्रिजेश दीक्षित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ जानेवारी २०२१

डिसेंबर २०२१ मध्ये सीए रोड आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरु होणार : डॉ. ब्रिजेश दीक्षित

डिसेंबर २०२१ मध्ये सीए रोड आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरु होणार : डॉ. ब्रिजेश दीक्षित
· नागरिकांच्या सहयोगाने मेट्रो सेवा शहरात लवकर सुरु झाली

नागपूर २४ : सेंट्रल एव्हेन्यू,(रिच -४) आणि कामठी मार्गावर (रिच - २) डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सेवा सुरु होईल महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित ह्यांनी मेट्रो संवादात हा विश्वास व्यक्त केला. ते उन्नती फाउंडेशन आणि छात्र जागृती तर्फे आयोजित *"मेट्रो संवाद"* च्या उपस्थितांना आणि छात्र जागृती संस्थेतील सदस्यांना संबोधित करीत होते. महत्वपूर्ण म्हणजे या मेट्रो संवादचे आयोजन महा मेट्रोने न करता स्थानिक नागरिकांनी आयोजित केला होता.

 

नागरिकांच्या सहयोगाने शहरात मेट्रो सेवा लवकर सुरु झाली :

कुठलाही प्रकल्प तयार करतांना १०० वर्षांचा विचार करून तयार केला जातो. प्रकल्पाची प्रगती बघून नागरिकांचा देखील सहयोग मिळतो असे विचार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो संवाद दरम्यान व्यक्त केले. ८ जून २०१७ रोजी सीए रोड मार्गावर मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य सुरु झाले व २०२१ या वर्षी नागरिक मेट्रोने या मार्गावर प्रवास करतील असे उद्दगार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केले. सध्या आनंद टॉकीज आणि कामठी मार्गावरील गुरुद्वारा  येथे रेल्वे लाईनच्या वर मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य सुरु असून सादर कार्य पूर्ण होताच मेट्रो नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असेल. शहरात वाहनांची संख्या वाढत असून मेट्रोच्या माध्यमाने उत्कृष्ट परिवहन साधन आता नागरिकांन करता उपलब्ध आहे.

 

मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत बाळगून देखील मेट्रोने प्रवास करने शक्य झाले आहे तसेच सेलिब्रेशन ऑन व्हील्स अंतर्गत अनोखा उपक्रम नागरिकांन करता उपल्बध आहे या मागचा मुख्य उद्देश नागरिकांना मेट्रो प्रकल्पाशी जोडणे. कोरोना नंतर प्रवासी सेवा सुरु झाल्यानंतर नागरिक मेट्रोचा जास्ती उपयोग करीत आहे.नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि विविध संघटनांच्या वेळेवर मिळालेल्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक सुलभपणे करता आले. चौकात स्थापित केलेल्या मूर्ती अबाधित ठेवून हे सगळे बांधकाम पूर्ण झाले आहे. कामाच्या सुरूवातीसआम्हाला सेंट्रल एव्हेन्यू वर करावयाच्या कामाची सर्वात मोठी चिंता होती दोन्ही बाजूंनीबहुमजली इमारती आणि अरुंद रस्त्यांवरील आधारस्तंभ ह्यांना बांधकाम त्रासदायक ठरण्याची शक्यता होती. मात्र तेथील नागरिकांनी त्रास सहन करूनही पूर्ण सहकार्य केले हे शहरवासीयांचे कौतुक करण्यासारखेच आहे.

 

कोणत्याही अडचणीशिवाय कमी वेळात कार्याचे यश मिळवून या ठिकाणी पोहोचल्याबद्दल डॉ दीक्षित ह्यांनी मेट्रोच्या संपूर्ण टीमला श्रेय दिले. मेट्रो कर्मचाऱ्यांनी सणासुदीला,उन्हा पावसातहीथंडी गर्मीची चिंता न करता २५ मीटर उंचीवर रात्रं-दिवस काम केलेयाचा परिणाम म्हणजे वेळे आधीच दर्जेदार काम करण्यात आम्हाला यश मिळालेह्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला की ह्या सगळ्या कष्टकऱ्यांमुळे कामा दरम्यान कोणताही व्यत्यय आला नाही. १०० कारणे असू शकतात ज्या कार्यात अडथळा आणतातया प्रकरणात महा मेट्रो भाग्यवान होती ज्यांना शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडूनही सहकार्य मिळाले आणि काम यशाची एक एक पायरी उरण करत राहिले. डॉ. दीक्षित यांनी आदरातिथ्य दर्शवताना उपस्थितांचे आभार मानले.

चांगले कार्य करतांना अडचणी येतात :(आमदार पूर्व नागपूर : कृष्णा खोपडे) : पूर्व नागपुरातील नागरिकांना उत्सुकता आहे कि या भागात मेट्रो सेवा कधी सुरु होणार या भागात मेट्रो सेवा सुरु  संख्येने नागरिकांना याचा लाभ होणार आहे. चांगले कार्य करतांना अडचणी येतात परंतु  ते कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांची आठवण अनेक वर्षानुवर्षे केल्या जाते.देशातील हृदयाच्या ठिकाणी नागपूर मेट्रो रेल्वेचे कार्य हे अभिमानस्पद आहे. उत्कृष्ट निर्णय घेण्याची क्षमात डॉ. दीक्षित यांच्या मध्ये असून माह मेट्रोची संपूर्ण चमू उत्कृष्ट कार्य करीत आहे असे गौरवपूर्ण उदगार श्री. खोपडे यांनी मेट्रो संवाद दरम्यान व्यक्त केले.    

 

महा मेट्रोने शहर जागतिक दर्जाचे बनविले आहे (श्री. अनिल पारखअध्यक्ष वर्धमान को. ऑप. बँक): श्री पारख यांनी मेट्रो संवाद दरम्यान सांगितले कि,महा मेट्रोने वेळोवेळी नागरिकांना सोबत घेऊन संवाद साधला.नागपूर मेट्रो शहराकरिता अभिमानाची बाब असून भविष्यात याचा लाखो नागरिकांना फायदा होईल. मेट्रो मुळे शहर सुंदर झाले असून शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे असे मत श्री. पारख यांनी व्यक्त केले.       

 

उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री. अतुल कोटेचा यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात महा मेट्रोचे काम सार्वजनिक सोयीसाठीच असल्याचे सांगितले तसेच व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिकां कडून दिले जाणारे सकारात्मक सहकार्य नेहमीच मिळत राहील असे आश्वासनही दिले.स्वागत भाषणनिवेदन व आभार प्रदर्शन श्री.निशांत गांधी यांनी केले.

संचालक (प्रकल्प) महा मेट्रो,श्री.महेश कुमार यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी कार्यकारी संचालक (प्रशासन -महा मेट्रो) श्री. अनिल कोकाटे व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच या परिसरातील प्रल्हाद ठाकरे,दिलीप रांका,संजय ठाकूर,नरेश भरूर,विश्व्जीत भगत,बाबुराव वंजारी,अमित वाजपेयी,वेणू गोपाळ मालू,कमल तापडिया,दिनेश पारेखमनोहरलाल आहुजा,संतोष गोल्डा,कृष्णा नागपाल,महेश श्रीवास,अशोक निखाडे,सुनील धोरकर,नरेश जुमानी,मनीष छल्लाणी,राजू वारजुरकर,प्रमोद मोहानी,ऋषी कोचर,दीपक रांका इत्यादी नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारीगन मान्य नागरिक,व्यापारी,उद्योजक उपस्थित होते.