आंध्र प्रदेश येथील "कन्नमचे' कन्नमवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२१

आंध्र प्रदेश येथील "कन्नमचे' कन्नमवार

 ओळख कर्तृत्वाची भाग-14

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार 

       
श्री.मारोतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 रोजी दुपारी 2 वाजता चंद्रपूर येथे झाला.त्यांच्या वडीलांचे नाव सांबशिवपंत व आईचे नाव गंगूबाई होते.चंद्रपुर येथील अंचलेश्वर विभागाजवळ भानापेट वार्डात त्यांचे घर होते.

 कन्नमवारांनी आंध्रातील आपल्या मूळ गावाचा शोध आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चेन्ना रेड्डी यांच्याकडून घेतला. कन्नम नावाच्या गावाचे राहणारे म्हणुन 'कन्नमचे' कन्नमवार असे पडले असे सांगण्यात येते.

घराण्याची फार मोठा वारसा नसलेली, आर्थिक स्थिती जेमतेम, सामान्य माणूस देखील असामान्यत्वाप्रत आपल्या अविरत सेवेने मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकतो, त्याचे उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण म्हणजे मारोतराव सांबशिवपंत कन्नमवार हे होय.

अश्या महान लोकनेता कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची जयंती 10 जानेवारीला आहे. आपण सर्व मोठ्या उत्सवात तयारी करून  जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरी करू. 


खिमेश मारोतराव बढिये

प्रचारक (नागपूर) 

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती नागपूर

8888422662, 9423640394