मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ याप्रमाणे स्नेह जपावा:- महिला जिल्हा अध्यक्ष अंजली घोटेकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० जानेवारी २०२१

मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ याप्रमाणे स्नेह जपावा:- महिला जिल्हा अध्यक्ष अंजली घोटेकर

मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ याप्रमाणे स्नेह जपावा:- महिला जिल्हा अध्यक्ष अंजली घोटेकर

चंद्रपूर : मकर संक्रांतीनिमित्त बाबुपेठ समता चौक येथे हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अंजलीताई घोटेकर आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश, गुळवाडे, महापौर राखीताई कंर्चलावार महामंत्री शीला चव्हाण,उपाध्यक्ष प्रभा गुडदे नगरसेवक प्रदीप किरमे, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, दशरथ सोनकुसरे,झोन सभापती कल्पना बगुलकर,  सचिव वंदना राधारपवार,  सदस्य रंजना उमाटे यांच्या उपस्थित संपन्न झाला आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये सौ अंजलीताई घोटेकर म्हणाल्या की कोरोनाचा काळामध्ये आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो परंतु अशा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण भेटत आहोत हळदी-कुंकू आणि तिळगूळ वाटप करून आपसातील सुखदुःख सांगून आपसी स्नेहा वळवण्याचे प्रयत्न करीत आहोत परंतु सर्वश्री ही करताना स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे बाहेर जाताना मास लावूनच निघावे, सोशल डिस्टंसिंग पाडावे आणि घरी गेल्यावर साबणाने स्वच्छ हात धुवावे आपली कुटुंब आपली जबाबदारी आहे यांची जाणीव ठेवून समाजात काम करावे भारतीय जनता पार्टी वाढविण्याकरीता सर्वांनी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे काम करावे यावेळी डॉक्टर मंगेश गुलवाडे व महापौर यांचे भाषण झालीत या कार्यक्रमाचे आयोजन अर्चनाताई उरकुडे, नगरसेवक प्रदीप गिरमे, युवा नेते अमोल नगराळे यांनी केले*,
 *या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मायाताई पडवेकर, वनिता उरकुडे,गीता किरमे, छाया खारकर वरारकर ताई विजया रंगारी, शुभांगी झोडे, बातो ताई,  संगीता साळवे,श्रीकांत पिंपळशेडे पराग मलोडे, कुणाल गुंडावर  संदीप पिंगे, सुरज पिंपळशेडे आदित्य उरकुडे ,यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी ठुसे यांनी केले तर प्रास्ताविक अमोल नगराळे यांनी केले व आभार टिकू साळवे यांनी मानले. सर्व महिलांना हळदीकुंकू तिळगूळ देऊन व माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडून आलेले कॅलेंडर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.