ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ जानेवारी २०२१

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून या जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. आजच्या निकालानुसार भाजपाने 104 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा फडकवला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.


श्री. उपाध्ये म्हणाले की, यापूर्वी जाहीर झालेल्या निकालांनुसार 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला असून जनतेनी अनैतिक पध्दतीने आघाडी करून सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवरचा रोष आणि उदासीनताही या निवडणुकीतून दाखवून दिली आहे.