बाळासाहेब ठाकरे यांना नवेगावबांध येथे अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ जानेवारी २०२१

बाळासाहेब ठाकरे यांना नवेगावबांध येथे अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना नवेगावबांध येथे अभिवादन

गोंदिया जिल्ह्यात बाळासाहेबांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

अनेकांनी केले शिवसेनेत प्रवेश


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.23 जानेवारी:-

शिवसेना प्रमुख,हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९५ वी जयंती मोठ्या उत्साहात गोंदिया जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करून आज साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमीत्त ग्रामीण रुग्णालय नवेगांवबांध येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेष जायसवाल,विभाग प्रमुख स्वप्निल पोवळे,नवेगावबांध शाखा प्रमुख मुकेश  चापेकर, त्रंबक बेहरे, घनश्याम कापगते , देवा देशमुख, व  शिवसैनीक बहुसंख्येने  उपस्थित होते[.अर्जुनी/ मोर विधान सभा क्षेत्रात शिवसेना वतीने शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या  जयंती निमित्ताने  केशोरी शाखेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.अर्जुनी/मोर तालुक्यात सदस्यता अभियान, नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवसेना  गोरेगांव तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. अर्जुनी/मोर व गोरेगांव मध्ये अनेकांनी  शिवसेनेत  प्रवेश केला.सड़क/अर्जुनी तालुक्यात ही विविध कार्यकर्म घेण्यात आले.