मुलगी चालवित होती कार; भीषण अपघातात तीन ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२१

मुलगी चालवित होती कार; भीषण अपघातात तीन ठारवर्धा : मंगळवारी पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक mh-40 BE8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडी चकनाचूर झाली. या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मुलगी चालवित होती कार;  भीषण अपघातात तीन ठार