नागपूर येथील अंभोरा तीर्थक्षेत्राला १७० कोटीचा निधी; अंभोरा बननार पर्यटन स्थळ:पालकमंत्री नितीन राऊत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ जानेवारी २०२१

नागपूर येथील अंभोरा तीर्थक्षेत्राला १७० कोटीचा निधी; अंभोरा बननार पर्यटन स्थळ:पालकमंत्री नितीन राऊत

 

नागपूर /खबरबात :
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी 170 कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. कुही तालुक्यातील अंभोरा तीर्थक्षेत्राला निधी कमी पडू देणार नाही.अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत केली. यावेळी विकास कामाबाबत सादरीकरणाचा आढावा घेण्यात आला.

अंभोरा तीर्थक्षित्रात शिव मंदिर, बुद्ध विहार, व छोटा दर्गा असे भाग असून याची. चार. झोनमध्ये विभागणी करण्यात येईल. आंभोरा येथे पाच नद्यांचा संगम असल्याने येणाऱ्या काळात पर्यटनाला मोठी मागणी या क्षेत्रात असणार आहे.भाविकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार


असून बोटींची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वृद्धांसाठी लिफ्टची व्यवस्था राहील.वैनगंगा नदीत बुद्ध मूर्ती, शिव पिंडी व त्रिशूल नव्याने निर्माण करण्याचे

प्रस्तावित आहे. याच सोबत केज फिशिंग व सोलर सिस्टीम्रसह मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क, वहा मार्ग थेट भंडारा येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राजू पारवे यांनी बैठकीत दिली.