आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या डीजी बिजेपी अॅपचा शुभारंभ सोहळा 25 जानेवारी रोजी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जानेवारी २०२१

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या डीजी बिजेपी अॅपचा शुभारंभ सोहळा 25 जानेवारी रोजी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या डीजी बिजेपी अॅपचा शुभारंभ सोहळा 25 जानेवारी रोजी
राष्‍ट्रीय मतदार जागृती दिवसाचे औचित्‍य

मतदार यादीतील पहिल्‍या मतदार आशा अलोणे यांच्‍या हस्‍ते होणार शुभारंभ
चंद्रपूर : माजी अर्थमंत्री तथा महाराष्‍ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या डीजी बिजेपी या अभिनव अॅपचा शुभारंभ सोहळा दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी राष्‍ट्रीय मतदार जागृती दिनाचे औचित्‍य साधुन आयोजित करण्‍यात आला आहे.
दिनांक 25 जानेवारी रोजी सायं. 4.00 वा. चंद्रपूर तालुक्‍यातील भटाळी या गावात संपन्‍न होणा-या शुभारंभ सोहळयात बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राच्‍या मतदार यादीतील पहिल्‍या सन्‍माननीय मतदार आशा विकास अलोणे यांच्‍या हस्‍ते या अॅपचा शुभारंभ करण्‍यात येणार आहे. विशेष म्‍हणजे नुकत्‍याच झालेल्‍या ग्राम पंचायत निवडणूकीत आशा विकास अलोणे या ग्राम पंचायत सदस्‍या म्‍हणून अविरोध निर्वाचित झाल्‍या आहेत.
राष्‍ट्रीय मतदार जागृती दिनाचे औचित्‍य साधुन डिजीटल संघटनेचे पहिले पाऊल उचलण्‍याच्‍या दृष्‍टीने हे अॅप आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन तयार करण्‍यात आले आहे. दिनांक 25 डिसेंबर 2020 पासून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन अटल डिजीटल चंद्रपूर ही सदस्‍यता मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. एक लक्ष डिजीटल कार्यकर्ता नोंदणी करण्‍याचे ध्‍येय निश्‍चीत करण्‍यात आले आहे. डीजी बिजेपी या अॅपच्‍या माध्‍यमातुन आपले लोकप्रतिनिधी व मतदार यांच्‍यातील जनसंपर्क, जनसंवाद दृढ करण्‍याचा मानस आहे. या अॅपच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍येक मतदाराला आपल्‍या लोकप्रतिनिधीबद्दल संपूर्ण मा‍हिती उपलब्‍ध असणार आहे. त्‍यांच्‍या मतदारसंघातील विकासकामे, चालु घडामोडी, दैनंदिन वर्तमानपत्र व त्‍यातील बातम्‍या, ऑनलाईन प्रसिध्‍दी, फोटोज, व्हिडीओज, मतदारसंघातील सर्व उपक्रम, मतदार संघातील सर्व लोकप्रतिनिधी व शासन प्रतिनिधी यांचे फोन नंबर उपलब्‍ध असतील. शिवाय या माध्‍यमातुन सर्व मतदारांना कोणत्‍याही प्रकारच्‍या सुचना, तक्रारी नोंदवायच्‍या असेल किंवा सर्व स्‍तरातील निवेदने द्यायची असतील तर ते सर्व डिजीटल अॅपच्‍या माध्‍यमातून देऊ शकतील. भाजपा प्रसिध्‍दी संदर्भातील सर्व फोटोज, व्हिडीओज, कार्यक्रमांची किंवा उपक्रकांची बातमी शेअर किंवा अपलोड करता येईल. हे अॅप चंद्रपूरातील जनसामान्‍य, मतदारांना व कार्यकर्त्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या भाषेत म्‍हणजेच मराठी, हिन्‍दी, इंग्रजी या तिन्‍ही भाषांमध्‍ये हे मोबाईल अॅप उपलब्‍ध असेल.
या मोबाईल अॅपमधून असणा-या सर्व माहिती, विकासकामे, चालु घडामोडी, फोटोज आणि व्हिडीओज आपण फेसबुक, व्‍हाट्सअॅप, टवीटर, इन्‍टाग्राम इत्‍यादी सोशल मिडीयावर एक क्‍लीकवर शेअर करू शकतात. हे अॅप वापरण्‍यासाठी आपल्‍याला गुगल प्‍ले स्‍टोअर किंवा अॅप स्‍टोअर वरून 25 जानेवारी 2021 पासून अर्थात मतदार जागृती दिवसापासून मतदारांच्‍या हक्‍काचे अॅप डाऊनलोड करता येईल. कार्यकर्ता आणि मतदार तसेच लोकप्रतिनिधींना जोडणारा सेतू म्‍हणून डीजी बिजेपी अॅप महत्‍वाची भूमीका बजाविणार आहे.
दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित या अॅपच्‍या शुभारंभ सोहळयाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शाखेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.