जुन्नर द्राक्ष महोत्सव 2021ची ची तयारी जोरात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ जानेवारी २०२१

जुन्नर द्राक्ष महोत्सव 2021ची ची तयारी जोरात

जुन्नर द्राक्ष महोत्सव 2021ची ची तयारी जोरातजुन्नर /आनंद कांबळे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यासंदर्भात आज जुन्नर येथे बैठक पार पडली .

या बैठकीमध्ये पर्यटन महोत्सवांमध्ये प्रत्यक्ष द्राक्ष बागांना भेटी, कृषी पर्यटन ,बैलगाडी रपेट, वाईन व वायनरी ला भेट , जुन्नरची खाद्यसंस्कृती , निसर्ग पर्यटन , धार्मिक पर्यटन ,विविध प्रकारचे बचत गटांचे स्टॉल, बचत गटांची उत्पादने इत्यादीचा अनुभव पर्यटकांना या द्राक्ष महोत्सवामध्ये घेता येणार असल्याचे पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांनी यावेळी सांगितले .
जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला असून, त्या अनुषंगाने, यापुढील काळात विविध प्रकारचे महोत्सव घेण्यात येणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या. द्राक्ष महोत्सवाच्या नियोजनासाठी  पर्यटन संचनालयाच्या उपसंचालीका, सुप्रिया करमरकर, एमटीडीसीचे विभागीय संचालक दीपक हरणे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे ,कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राहुल घाडगे, कृषी अधिकारी डी एस जाधव, पंचायत समिती जुन्नरच्या अभंग मॅडम ,पर्यटन संचालनालयाचे पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे ,जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, साहस पर्यटन चे प्रमुख जितेंद्र देशमुख, तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण डिफरेन्ट फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक एफ.बी. आतार जुन्नर पर्यटन गाईड ओंकार ढाके, लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास कडलक, इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे , आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे आनंद जाधव , द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक कोकणे, सदाशिव ताम्हाणे ,रमेश मेहेर,  शिरीष डुंबरे, रुपेश शहा ,संजय काशीद, सत्यवान खंडांगळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.