चंद्रपूरी वडे आणि चिंचेचे सार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ जानेवारी २०२१

चंद्रपूरी वडे आणि चिंचेचे सार

 ओळख कर्तृत्वाची भाग-16

(अंतिम भाग) 

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार 

                          !! 16 !!

दादासाहेब कन्नमवारांना लहानपणी हॉकी आणि क्रिकेटचा फार छंद होता.ते स्वतः जंगलात जाऊन लाकडे तोडीत व त्याच्या हॉकी स्टिक व छोट्या बॅटस तयार करीत. तसेच घरासमोरील मोकळ्या जागेवरील खाचखळगे बुजवून त्यांनी एक छोटे ग्राउंडही बनविले होते. त्याठिकाणी ते आपली खेळण्याची हौस पूर्ण करीत असत.


कन्नमवारांचे खेळाकडे अधिक लक्ष असले तरी त्यांना अभ्यासाची आवड होती. अभ्यासाखेरीज इतरही पुस्तके ते वाचीत असत. त्यांच्या इतिहास हा विषय आवडीचा होता. नंतरच्या काळात संतवाड:मयाचे वाचन याचा छंद असला तरी अन्य वाचन चालूच असे. लेखन, वाचन, कात्रणे काढणे आणि कार्यकर्त्याशी संभाषण हे कन्नमवारांचे आवडीचे छंद होते.

त्यांना जसा सिनेमा नाटकाचा छंद नव्हता; तसाच मेजवान्या नि पार्ट्यांचाही छंद नव्हता. चंद्रपूरी वडे आणि चिंचेचे सार हे त्यांना आवडीचे पदार्थ होते .ते जेवण्यासाठी जगणारे नव्हते, तर जगण्यासाठी जेवणारे होते.नंतरच्या काळात विरंगुळा म्हणून ते तपकीर ओढत असत. एरवी कसलेच व्यसन त्यांना नव्हते. वेळ मिळाल्यास विरंगुळा म्हणून ते आपल्या लहान नातवांशी चेंडू, विटीदांडू खेळत. पतंग उडवीत तसेच नागपुरी पद्धतीने मुलांशी पंजा खेळून त्यांना ताकद वाढविण्यास उत्तेजित करीत . फुरसत मिळाल्यास ते मुलांचा ( नातवांचा ) अभ्यासही करून घेत. सुवाच्च अक्षरांवर त्यांचा भारी कटाक्ष होता.


24 नोव्हेंबर 2018 रोजी वणी जि.यवतमाळ येथे दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी दिनानिमित्य आयोजित "दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार मेळाव्यादिनी" दादासाहेबांचा सहयोगी प्रल्हादपंथ क्रुष्णराव रेभे (गोवा मुक्ती मोर्च्याचे संयोजक) यांचा दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीने मुलाखात घेतला असता, प्रल्हादपंत रेभे म्हणतात, " दादासाहेब अतिशय प्रेमळ, देवमाणूस हो, यासारखा राज्यकर्ता, दूरदृष्टी, निष्ठावंत आज होणे कठीण आहे,  मी जेव्हा त्यांना भेटायला नागपूर, मुंबई येथे जायचो तर गेल्याबरोबर पहिले जेवन कर मग निवांत बोलू, बोलतांना पहिले परिवाराची माहीती घेणे. मग कामाचे बोलने, वणी जि.यवतमाळ येथील पाणी पाणी पुरवठा पाईप लाईनची चर्चा सुरू होती, मोठमोठ्याले इंजिनिअर मंडळी दादासाहेबांना समजवीत होते, तुम्हाला जाणीव नाही दादासाहेब लीकेज बरोबर होणार नाही, दादासाहेब म्हणाले, असे लीकेज काढण्यात जिंदगी गेली, जातीचा बेलदार आहे, ज्या सरकारी इमारती आहे ती बेलदार समाजाचे देन आहे, लीकेज कसे काढायचे कळते आम्हाला, तुम्हाला जमते का सांगा, नसेल तर मी करवून घेईन, असे म्हणून चंद्रपूर येथून काही कारागिरांना वणी पाठवून 15 दिवसात काम पूर्ण केले.  वणी वासियांना पाणी मिळाले, ही दादासाहेबांची देन आहे. चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा जोडणारा पाटाळा (वरोरा-वणी मार्गावरील) पुलाचे उदघाटन होणार होते.दादासाहेब येणार यासाठी आम्ही पुलावर उभेच होते, पण दुखःद बातमी आली. दादासाहेबांचा पक्षाघाताने म्रूत्यू झाला" असे सांगत दादासाहेबांच्या आठवणीत 90 वर्षाचे प्रल्हादपंथ रेभे यांच्या डोळ्यातून पाणी येत होते.


दादासाहेब फार काळ मुख्यमंत्री पदावर राहू शकले नाही. हाती सूत्रे घेतल्यानंतर कामाचा प्रचंड ताण त्यांच्यावर पडला. त्यातच त्यांना मधुमेहाची त्रास सुरू झाला. म्रुत्युच्या दोन दिवस आधी ते एका कार्यक्रमाला गेले होते.सततचा दगदगीमुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यातच त्यांचा 24 नोव्हेंबर 1963 ला म्रूत्यू झाला. काम करीत असतानाच आपल्याला म्रूत्यू यावा, ही त्यांची इच्छा त्यांच्या निधनाने खरी ठरविली.

एका मागासलेल्या भागातून आणि भटक्या जमातीपैकी सर्वसाधरण कुटुंबातून आलेल्या व्यक्तीच्या आणि तिच्यातील नेतृत्वगुणांचा विकास आश्चर्यकारक आहे. प्रशासक व प्रशासनाचे नियंत्रण करणारे राजकीय शासक म्हणूनही त्यांची भूमिका प्रभावी दिसते.

या महामानवाचा जन्मोत्सव 10 जानेवारीला येत आहे तरी जन्मोत्सव सोहळा प्रत्येक ठिकाणी भव्य स्वरूपात झालेच पाहिजे.


 

खिमेश मारोतराव बढिये 

प्रचारक (नागपूर) 

 दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर

8888422662, 9423640394