'पाचाड' गावी राजमाता जिजामातेच्या स्मृतीस्थळी धर्मशाळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२१

'पाचाड' गावी राजमाता जिजामातेच्या स्मृतीस्थळी धर्मशाळा

 ओळख कर्तृत्वाची - 12

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार 

                       !! 12 !!ज्या सिरोंचावर आंध्राचा  (सध्याचा तेलंगाना) डोळा होता, तो महाराष्ट्राशी जोडून घेण्याकरिता 19,38,000/- रुपये खर्च करून आष्टी येथे वैनगंगेवर 1725 फूट लांबीचा पूल तयार करविला.या पुलामुळे चंद्रपूर- सिरोंचा हा मार्ग नेहमीचा  खुला झाला असून, 24 मे 1963 ला कन्नमवार यांच्या हस्तेच त्या पुलाचे भव्य उदघाटन झाले.


वैनगंगा नदीवरील पुराण प्रसिद्ध मृत्युंजय मार्कंडेय स्थान मार्कंडा. या ठिकाणी महाशिवरात्रीला दरवर्षी फार मोठया संख्येने भाविक त्या ठिकाणी जायचे.परंतू भाविकांचे फार हाल व्हायचे.ही अडचण लक्षात घेऊन कन्नमवारांनी त्या पवित्र क्षेत्राची अवस्था बदलवुन टाकली.यात्रेकरुंसाठी सरळ मोटार मार्ग, विजेची सोय, शुद्धपाणी(नळ योजना) यांची व्यवस्था केली आणि महाशिवरात्रीला फक्त एक दिवस भरणारी यात्रा 15 दिवसांवर नेली.


चंद्रपूरला भरणारी महाकालीची इतिहास प्रसिद्ध चैत्र पौर्णिमेची 2 - 3 दिवसाची यात्रा कन्नमवारांनी नगरपालिकेला मार्गदर्शन करून महिना - सव्वा महिन्यावर नेली.

एकदा कन्नमवार दौऱ्यानिमित्त अलिबाग गेले, तेव्हा तेथील लोकांनी रायगडजवळ असलेल्या 'पाचाड' या गावी धर्मशाळा बांधण्याची विनंती केली. या ठिकाणी राजमाता जिजामाताचा मृत्यू झाला होता. त्याला त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन सरकारतर्फे धर्मशाळा बांधाव्यात जाहीर केले व जिजामातेवर गाढ प्रेमाची ग्वाही दिली.आणि तसेच सिंधखेडराजा येथे राजमाता जिजामाता स्मारकाचा पाया कन्नमवारानीच घातला. 

 

खिमेश मारोतराव बढिये

प्रचारक (नागपूर) 

दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती  नागपूर

8888422662, 9423640394