दिव्यांगाच्या विकासासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे यावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ डिसेंबर २०२०

दिव्यांगाच्या विकासासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे यावे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री फुटाणे यांचे आवाहन

नागपूर - दिव्यांगावर विविध प्रयोगातून, उपचारातून मात करता येते. दिव्यांगाच्या जिवनात प्रकाश फुलवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने एक पाऊल समोर यावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलकिशोर फुटाणे यांनी केले.
नागपूर येथील शासकीय अपंग बहुउद्देशीय संमिश्र केंद्रात गुरुवारी (ता 3) जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलकिशोर फुटाणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री अनिल किटे, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, श्री प्रल्हाद लांडे, डॉ राकेश येवले, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव खिमेश बढिये, प्रा. शेंडे, शालीनी वंगाणी, प्रमिला साठवणे, आनंद पाटील, अधिक्षक सुरेश माळोदे, प्रशांत वाढिवे, सचिन रामटेके उपस्थित होते.
यावेळी राज्यातील पहिला प्रयोग म्हणून अपंग संमिश्र केंद्रात 'पूर्व निदान उपचार केंद्राचे' उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाच्या विकासासाठी भरकस प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त काळजीवाहक श्रीमती अन्नपूर्णा शेंडे यांचा तर दिव्यांग विद्यार्थी रुपेश सवाईमूल (उद्योजक), संतोष फड (UPSC प्राथमिक पास), नागेश कांबळे (स्वयंरोजगार), भूषण (विद्यार्थी) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक सुरेश माळोदे यांनी तर संचालन वाचातज्ञ दिनेश गेटमे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रविण मोंढे यांनी मानले. यावेळी यावेळी पौर्णिमा गढवाल, अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना खोब्रागडे, बबीता बोदेले, कल्पना नाईक, प्रशांत वाडिके, श्रीमती शुभांगी पोहरकर, पंकज कोलते, गजानन मडावी, गोपाल अवसरकर, अनिल वाळके, श्री भलावी, श्रीमती कमला सिहोने, छाया मेंढे, श्रीमती कौरीके, दिलीप समुद्रे, शिला बांगर उपस्थित होते