WhatsApp स्वाध्याय व Read To Me विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. - शरद भांडारकर, केंद्रप्रमुख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ डिसेंबर २०२०

WhatsApp स्वाध्याय व Read To Me विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. - शरद भांडारकर, केंद्रप्रमुख

वाडी- पंचायत समिती, नागपूर अंतर्गत समूह साधन केंद्र वाडी मधील कार्यरत जिप शाळांच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत शासनाच्या शाळा बंद.....शिक्षण सुरू उपक्रमांतर्गत सर्व जिप शाळांमधून "व्हाट्सएप स्वाध्याय" व "रीड टू मी अँप" प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन समूह साधन केंद्र वाडीचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी केले.
कार्यशाळेत शासनाचे विविध उपक्रम व विविध योजनांचा आढावा घेऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत प्राथमिक शाळा दवलामेटी व उ प्रा शाळा, डिफेन्स हिंदी या शाळांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रशंसा करण्यात आली.
कार्यशाळेला सर्वश्री प्रवीण मेश्राम, विजय बरडे, रामेश्वर मुसळे,सुधीर बाराहाते, डी.एस. तिरपुडे,अनिल गेडाम, युवराज उमरेडकर, कमलाकर राऊत,अरुण मोहने, साहेबराव मोहारे, बंडू लोहारे तसेच सर्वश्रीमती उमा चौधरी,अनिता पाटील, कुसुम कडस्कर, आशा सोमकुवर, प्रियदर्शनी मौदेकर, माधुरी घोरमाडे इत्यादी उपस्थित होते.
कार्यशाळेचे संचालन पुरुषोत्तम चिमोटे व ललिता गोंडचर यांनी तर आभार प्रदर्शन योगिता गुप्ता यांनी पार पाडले.