कृती आराखडा आणि कामाचा सेल्प तयार करण्यासाठी गाव शिवार फेरी कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ डिसेंबर २०२०

कृती आराखडा आणि कामाचा सेल्प तयार करण्यासाठी गाव शिवार फेरी कार्यक्रम
पंचायत समिती जुन्नर प्रशासन ,मनरेगा विभाग जुन्नर प्रशासन ,आणि किसान सभा जुन्नर तालुका समिती याच्या संयुक्त नियोजनातून मनरेगाच्या व्यापक अमलबजावणी साठी तालुक्यातील गावागावातील मनरेगा कामाचे कृती आराखडा आणि कामाचा सेल्प तयार करण्यासाठी गाव शिवार फेरी कार्यक्रमजुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील   जळवंडी गाव क्षेत्रात मनरेगा अंतर्गत कामाची निवड करण्यासाठी  गाव शिवार फेरी आज पार पडली. 

गाव शिवार  फेरीच्या माध्यमातून मनरेगाच्या सार्वजनिक, वैयक्तिक दोनी प्रकारच्या कामाची निवड करण्यात आली या शिवार फेरीसाठी
कृषी विभाग, मनरेगा विभाग ,महसूल विभाग कर्मचारी उपस्थित होते

निवड करण्यात आलेली सार्वजनिक मनरेगा अंतर्गत कामे 
1) फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत cct काम 
2) पाणंद रस्ते 
3)  सार्वजनिक विहिरी 
4) सार्वजनिक वृक्ष लागवड,फोरेस्ट क्षेत्रात वृक्ष लागवड
5) नाला बांध, सिमेंट बंधारे,शेतीचे बांध 
6)सार्वजनिक शैचालाय
निवड करण्यात आलेली वैयक्तिक कामे
1) शोष खड्डे
2) गांडूळ खत व्यवस्थापन
3) वैयक्तिक विहिरी
4) शेततळे
5)फळबाग लागवड 

या कामाची निवड करण्यात आली  या गाव शिवार फेरीसाठी किसान सभा  तालुका समितीचे उपाध्यक्ष नारायण वायाळ यांनी उसरान ,खडकुंबे,जळवंडी या ठिकाणी जाऊन कामाची शिवार फेरीत कामाची माहिती बाबत मार्गदर्शन केले 

या फेरीसाठी  पशुवैद्यकीय डॉ  डेरे व डॉ  साबळे तसेच जळवंडी गावच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राठोड सर ,ग्रामपंचायत शिपाई सोमा वायाळ, अमित वायाळ, संदीप करवंदे, किरण शेळकंदे, प्रदीप ,प्रदीप वायाळ, दादाभाउ उंडे, नामदेव साबळे, बाळू साबळे, संतोष शिर्के, 
बाळू वायाळ , धोंडू साबळे उपस्थित होते

 .