शीतल आमटे यांच्या खोलीतून काय काय सापडलं? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ डिसेंबर २०२०

शीतल आमटे यांच्या खोलीतून काय काय सापडलं?चंद्रपूर/ प्रतिनिधी
डॉ. शितल आमटे यांच्या खोलीतून पोलिसांनी एक लॅपटॉप, तीन भ्रमणध्वनी संच, मोठ्या प्रमाणात औषधीसाठा, लसीचे सिरिंज आणि कपडे ताब्यात घेतले असून, भ्रमणध्वनी संचातील मजकुराची तपासणी केल्यानंतर चौकशीला योग्य दिशा मिळेल, असा विश्‍वास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. शितल यांच्या कार्यालयातील सिसिटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी ज्यांच्याशी संपर्क केला, संवाद साधला त्या सर्वांशी संपर्क करणे सुरू आहे. त्यांचेही म्हणणे विचारात घेतले जात असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथील फॉरेन्सीक चमुने तीन तास तपासणी करून खोलीतील आवश्यक काही वस्तू ताब्यात घेतल्या असून, त्यांचाही अहवाल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी पथके तयार करून तपासाला सुरूवात केली आहे. दोन दिवसात योग्य निष्कर्षापर्यंत पोहचू, अशी आशा डॉ. पांडे यांनी व्यक्त केला.