वांगी खोबा हा रस्ता देतो अपघात व मृत्यूला आमंत्रण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ डिसेंबर २०२०

वांगी खोबा हा रस्ता देतो अपघात व मृत्यूला आमंत्रणआधी रस्ता तयार करा, तेव्हाच जाऊ देणार- खोबा ग्रामवाशीयांची मागणीसंजीव बडोले/ प्रतिनिधी
नवेगावबांध दि. 8 डिसेंबर:-
गेल्या दीड महिन्यापासून वांगी चिंगी ते खोबा या रस्त्यावरून शिवालया कंट्रक्शन कंपनीचे टिप्पर वांगी वरून मुरमाची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. चिंगी गावातील एका महिलेचा मृत्यू देखील अपघातात झाला आहे. हा रस्ता शिवालय कंट्रक्शन कंपनी ने बांधून द्यावा, तेव्हाच कंपनीचे टिप्पर या रस्त्याने जाऊ देणार. या मागणीसाठी आज 8 डिसेंबर मंगळवार ला सकाळी 10 वाजेपासून रस्ता अडवून रस्ता रोको आंदोलन खोबाहलबी ग्राम वासियांनी केले. गेल्या काही महिन्यापासून कोहमारा नवेगावबांध वडसा या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी वांगी वरून गेल्या दीड महिन्यापासून शिवालया कंट्रक्शन कंपनी टिप्पर द्वारे मुरमाची वाहतूक करीत आहे. 38 ते 40 टन वजनाचे टिप्पर या रस्त्यावरून धावतात. त्यामुळे हा रस्ता खराब झाला. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघात व मृत्यूला आमंत्रण देत आहे. मागील आठवड्यात चिंगी येथील मायाबाई शिवणकर ह्या मोटर सायकलवर बसून जात असताना, खड्ड्यात मोटरसायकल गेल्याने अपघात होऊन गंभीर जखमी झाल्यात. नागपूरला उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दीड महिन्यात असे अनेक अपघात झाले. अशी माहिती गावकर्‍यांनी दिली आहे.खराब झालेला रस्ता दुरुस्त करून देतो असे आश्वासन कंपनीने दिले. परंतु अद्यापही रस्त्याचे बांधकाम करून दिले नाही. त्यामुळे संतप्त खोबाहलबी ग्रामवासियांनी आज दिनांक 8 डिसेंबरला सकाळी दहा वाजेपासून रस्ता रोखून धरला. त्यामुळे बराच वेळ या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली. आधी रस्ता तयार करा, नंतरच टिप्पर जाऊ देणार ,अशी भूमिका संतप्त गावकऱ्यांनी घेतली. जोपर्यंत कंपनी रस्ता तयार करून देत नाही, तोपर्यंत या रस्त्यावरून टिप्पर जाऊ देणार नाही. अशी भूमिका गाववाशियानी यांनी घेतली आहे. या आंदोलनात खोबाहलबी गट ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनराज आसटकर, छोटेलाल मेश्राम, धनलाल शेंडे, धनराज टेंभुर्णे, हरी पंचभाई, युवराज गजभिये, रत्नदीप बोरकर, किशोर रामटेके आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.