मुंबईसह कोकणात पाऊस; कमालीचा गारवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ डिसेंबर २०२०

मुंबईसह कोकणात पाऊस; कमालीचा गारवा
#अरबीसमुद्र निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे #मुंबई अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी हजेरी लावणाऱ्या आमदारांची तसेच कामावर निघालेल्या चाकरमण्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने मुंबईत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

#रायगड जिल्ह्यात सकाळी आठ वाजतापासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतो आहे. तळा ते पनवेल तसेच मुरूड #अलिबाग सह सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, सुपारी बागायतदार हवालदिल झाले आहेत.


#पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांत आज सकाळपासून रिमझिम #पाऊस पडत आहे. ऐन हिवाळ्यात तीन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे हवेत अत्यंत गारवा निर्माण झाला आहे. सर्वत्र पावसाचं वातावरण कायम आहे.