लाखोटीया भुतडा विद्यालयात प्राचार्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ डिसेंबर २०२०

लाखोटीया भुतडा विद्यालयात प्राचार्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविलाय कोंढाळी जि नागपूर येथे सोमवार 14 डिसेंबरला प्रथम मुलीचे आगमन प्रसंगी प्राचार्य गणेश शेंभेकर यांनी स्वागत करण्यात आले. सर्व वर्ग व्यवस्था, मैदान, स्वच्छता गृह, पिण्याचं पाणी आदी व्यवस्था शासनाने दिशानिर्देश नुसार करण्यात आले आहे.


कोरोना प्रादुर्भावा मुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या #नागपुर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 9 ते 12 वी वर्गापर्यंत च्या शाळा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये सुरू झाल्या आहेत.

शाळा सुरू होत असल्याचा पार्श्वभूमीवर शाळांनी शासनाने लागू केलेल्या #कोविड नियमांची अंमलबजावणी केली असून सॅनेटायझर ,मास्क #PhysicalDistancing च्या नियमांसह 20-20 विद्यार्थी संख्येचे वेगवेगळे तुकड्या तयार करुन शाळेत उपस्थित राहण्याबाबत शाळा प्रशासनातफे सांगण्यात येत आहे .