गृहमंत्र्यांनी लिहिली रामदास आठवलेवर कविता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ डिसेंबर २०२०

गृहमंत्र्यांनी लिहिली रामदास आठवलेवर कविता

Poem on Ramdas Athavale written by Home Minister
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितांची भूरल अनेक राजकीय नेत्यांना पडली आहेत. कधी जाहीर सभा असो की संसदेतील भाषण रामदास आठवले हमखास आपल्या कवितेच्या शैलीतून प्रहार करतात. अनेकांना हसवतात. इतकेच काय तर ते स्वतः हसतात. मग संसदेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी  असोत की काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे देखील त्यांच्या कविता ऐकून पोट धरून हसतात. अशा कवी महाशय मंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना शुभेच्छा देताना त्यांच्यावर कविता लिहिलेली आणि ती ट्विटर'वर आणि फेसबुकवर शेअर केली केली आहे.


बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग

आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सध्या ही कविता चांगलीच फेमस झालेली आहे