अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०२०

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी ) :

भद्रावती तालुक्यातील माजरी येथून चंद्रपूर येथे आलु कांद्याच्या खरेदीसाठी दुचाकीने निघालेल्या व्यापाऱ्याचा वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 4 डिसेंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास चंद्रपूर नागपूर महामार्गावरील कोंढा नाल्या जवळ घडली.
अब्दुल वाहाब वय 50 वर्ष असे मृतकाचे नाव असून दीपक गुप्ता वय 31 राहणार मांजरी असे गंभीर जखमी चे नाव आहे. हे दोघेही माजरी वरून दुचाकी क्रमांक एम एच 34 बीके 1957 या वाहनाने कडोली मार्गे चंद्रपूर कडे जात असताना भद्रावती कडून नागपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला जखमी युवकाला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होऊन अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.