विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; दोघांना अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० डिसेंबर २०२०

विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; दोघांना अटक

जुन्नर दिं २९ वार्ताहर
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन तरुणांसह त्यांना मदत करणारा त्यांचा मित्र अशा तीन जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.सौरभ भगवान वाळुंज व करण शिवाजी वाळुंज दोघे राहणार तांबे तालुका जुन्नर व वआदित्य गुलाब कबड्डी राहणार कबाडवाडी अशा तीन जनांवर भारतीय दंड विधान कलमानुसार तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात असताना सौरभ व करण यांनी तिला अडवून जवळच्या शेतात जबरदस्तीने नेले व तिच्यावर या दोघांनी बलात्कार केला. तसेच करण याने तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र आपल्या मोबाईल मध्ये  काढुन झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तीचे  फोटो समाज माध्यमावर प्रसिद्ध  करण्याची धमकी दिली .त्यानंतर हे दोघे तिथून आदित्यच्या दुचाकीवर बसून पसार झाले.याप्रकरणी संबधीत  पीडितेने जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जुन्नर  केली.पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी     मंदार जवळे ,  पोलीस निरीक्षक विकास जाधव ,पोलीस कर्मचारी सागर हिले ,अनिल लोहकरे ,सुधीर काठे  आदींनी तातडीने  कारवाई  करून या यातील दोन आरोपींना अटक  केली.या प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक मंदार जवळे करत आहेत.