महाज्योती मार्फत जेईई-निट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ डिसेंबर २०२०

महाज्योती मार्फत जेईई-निट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षणओबीसी व व्हिजेएनटीच्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

२५ डिसेंबर पर्यंत नोंदणी करा

महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक श्री खिमेश बढिये यांचे आवाहन

नागपूर - ओबीसी व्हिजेएनटी साठी स्थापन केलेल्या महाज्योती मार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक खिमेश बढिये यांनी केले आहे.

महाज्योतीने, २०२२ मध्ये होणार्‍या JEE/MH-CET/NEET या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आखण्यात आलेला आहे, यावर्षी इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणार्‍या ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावुन यासाठी २५ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक श्री खिमेश बढिये यांनी केले आहे. यात या वर्षी वर्ग ११ वी सायंस ला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत, ते शहरी भागातील शाळांमधुन १० वी ला ७०% गुण, व ग्रामीण,आदिवासी व नक्षलग्रस्त भागातुन १० वी पास करणारे ६०% व त्या वरील गुण प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच ज्यांचे उत्पन्न मर्यादा ही नाॅन क्रिमिलेयर प्रमाणे वार्षिक ८ लाख रूपये आहे असे विद्यार्थी महाज्योतीकडे मोफत प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे.
या महाज्योती प्रशिक्षण कार्यक्रमात  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ५०%, नागरी विभाग १५%, नगरपंचायती १५% व आदिवासी व नक्षलग्रस्त विभागासाठी १५% जागा राखीव राहणार असून या प्रमाणे राज्यातील सर्व घटकांना त्यांच्या या  प्रमाणात प्रतिनिधीत्व, न्याय व संधी देण्याचा प्रयत्न असल्याचे महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे व प्राचार्य डॉ बबनराव तायवाडे यांनी महाज्योती बचाव कृती समितीला सांगितले. 


या विद्यार्थ्यांमध्ये प्रर्वगनिहाय आरक्षणाप्रमाणे इतर मागास वर्गचे (OBC) ६८०० विद्यार्थी, भटके विमुक्त प्रवर्गाचे (VJNT) २७०० विद्यार्थी आणि विशेष मागास प्रवर्गचे ( SBC) ५०० विद्यार्थी अशा प्रकारे १० हजार विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना राज्यातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांमार्फत आनलाईन व आॅफलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या  विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅब स्पर्धा परीक्षेची पुस्तके व शैक्षणिक साहित्य व ईतर सर्व मदत देण्याची योजना आहे. 

तरी या ओबीसी, भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावुन JEE/MH-CET/NEET साठी 
आपली विनामुल्या नोंदणी करावी. तसेच  ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान प्राध्यापकांनी या वर्षी ११ वी विज्ञान वर्गात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांची महाज्योतीकडे मोफत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे मुख्य संघटक श्री खिमेश बढिये, मुकुंद अडेवार, किशोर सायगन, दिनानाथ वाघमारे, शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, राजेंद्र बढिये, नामा जाधव, शेषराव खार्डे, दिनेश गेटमे, महेश गिरी, अविनाश बडे, अनील राऊत, धिरज भिसीकर, निशा मुंडे, राणा जोगराणा व महाज्योती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.