महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने आशा वर्कर्सचा सन्मान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ डिसेंबर २०२०

महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने आशा वर्कर्सचा सन्मान

जुन्नर / आनंद कांबळे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिना निमित महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने सावित्रीच्या लेकी आशा वर्कर्सचा कोव्हिडं योध्दा पुरस्कार व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन सत्कार करण्यात आला. सावरगाव येथील प्राथमिक  आरोग्य केंद्रात दि.3 रोजी  सकाळी ठीक १० वा.मान्यवरांचे हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला तसेच डॉक्टर व नर्स  कर्मचारी यांना बालाजी उद्योग समूहव,बी के टी टायर  वतीने सुरक्षा किट (पीपी किट) चेही  वाटप करण्यात  आले.   

       कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गावा गावात आशा वर्कर्स यांनी अखंडपणे  मदत कार्य सुरू ठेवलेले आहे . अशा जुन्नर तालुक्यातील सर्वच आशा वर्कर्सचा गावागावात जाऊन  टप्प्याटप्प्याने  ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी दिली.    

 यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे साहेब, ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर भोर सर, आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष डोके, ह भ प किसन महाराज, आंबेगाव सोशल मीडिया प्रमुख निलेश इळवे, सावरगाव तंटामुक्ती अध्यक्ष राजन बाळा सराफ सावरगाव सरपंच रेणुका ताई वारे बस्ती सरपंच रोहिदास गोरडे, प्रकाश गिधे, ज्ञानेश्वर काचळे, आशिष हिंगे, बाळासाहेब बाळसराफ तालुका अध्यक्ष वसंतदादा कापरे, संपर्कप्रमुख संतोषजी भुजबळ, सचिव रणजित कानडे जुन्नर शहराध्यक्ष संजय डोके जुन्नर शहर कार्याध्यक्ष सुमंत मेहेर जुन्नर शहर उपाध्यक्ष नितीन शेरकर नारायणगाव शहर सचिव नितीन कोल्हे  ओतूर  शहर उपाध्यक्ष नितीन डोके सागर भास्कर इतर मान्यवर उपस्थित होते