गुगल'मध्ये तांत्रिक अडचण; सेवा ठप्प Google - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ डिसेंबर २०२०

गुगल'मध्ये तांत्रिक अडचण; सेवा ठप्प Google
इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या 'गुगल'मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा डाऊन झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, 'गुगल'कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.