मेहा बुजरुक येथील माजी सरपंच गजानन सावकार निकुरे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ डिसेंबर २०२०

मेहा बुजरुक येथील माजी सरपंच गजानन सावकार निकुरे यांचे निधन
सावली तालुक्यातील मेहा बुज येथील माजी सरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष गजानन सावकार निकुरे यांचे 12 ङिसेंबर रोजी निधन झाले.
ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली आहेत. त्यांच्या पार्थिवावर 13 ङिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजानन सावकार निकुरे यांनी आपल्या सरपंच काळात विविध विकास कामे केलीत. याशिवाय गावात गुरुदेव सेवा मंडळ आणि अध्यात्मिक कार्यक्रमाची रुची वाढविली. तेली समाजाला एकसंघ करून संताजी मंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.