डॉक्टर शीतल आमटे यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपला डोळ्यांचे पासवर्ड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ डिसेंबर २०२०

डॉक्टर शीतल आमटे यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपला डोळ्यांचे पासवर्ड

नागपूर / प्रतिनिधी
आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणात तपासासाठी साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र, डॉ. शीतल यांच्या मोबाईल, लॅपटॉपला डोळ्यांचे पासवर्ड असल्याने ते उघडण्यासाठी अङचण येत आहे.डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असून या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शोधण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा लागलेली आहे आत्महत्येमागील कारण तपासण्यासाठी नोकर, घरगुती काम करणारे आणि नातलग यांची चौकशी करण्यात आली आहे. डॉक्टर शीतल यांनी मोबाईल लॅपटॉप यांना सुरक्षेच्यादृष्टीने स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नागपूरच्या फॅरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटीतील तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मदत होईल.