अनिल जैवार प्रामाणिक शिक्षक - गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ डिसेंबर २०२०

अनिल जैवार प्रामाणिक शिक्षक - गटशिक्षणाधिकारी दिनेश धवडशिक्षण क्षेत्रासाठी झटणारा खरा शिक्षक अनिल जैवार - गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड

# केंद्रप्रमुख अनिल जैवार यांचा निरोप समारंभ

तालुका प्रतिनिधी/४ डिसेंबर
काटोल - शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा व कोणत्याही शैक्षणिक कार्यासाठी सदा तत्पर असणारा प्रामाणिक शिक्षक म्हणजे अनिल जैवार होय.त्यांनी गेले ३२ वर्ष शाळेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे.असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी कचारी सावंगा केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल चंपतराव जैवार यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य संजय डांगोरे, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के,मंथन फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर बुटे, सरपंच कल्पनाताई अनिल गजभिये, शा.व्य. स. अध्यक्ष कविताताई दिवाकर वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजू बगवे, संचालन भावना बगवे तर आभार प्रदर्शन प्रियंका जंगले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय धवड,संजय कडू, संजय वंजारी, शुभांगी महल्ले,चंद्रशेखर गजभिये, प्रकाश तरटे यांनी परिश्रम घेतले.