नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ डिसेंबर २०२०

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात
आज #नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पदवीधर पदवीधर मतदार संघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.सुरवातीला टपाली मतमोजणी करण्यात येत आहे तत्पूर्वी सकाळी 8 वाजता विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी मतमोजणीच्या गोपनीयतेची सूचना सर्वांना दिली.
नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकित 19 उमेदवार रिंगणात आहेत.64.38 टक्के एवढे मतदान झाले आहे.

नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीसाठी आज मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदानाला सुरुवात करण्यात आली.आजच्या मतमोजणीची सुरवात होतांना पदवीधर निवडणुकीसाठी निरीक्षक एस वी श्रीनिवास व विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार विभागातील सहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित आहेत.आजच्या मतमोजणी प्रक्रियेत 4 हॉलमध्ये प्रत्येकी सात अशा एकूण 28 टेबलवर मतमोजणी करण्यात येत आहे. प्रत्येक टेबलवर काऊंटीग सुपरव्हायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी कार्यरत असून मदतनीस म्हणून 2 तहसीलदार व १ लिपिक कार्यरत आहे. सध्या टपाली मतमोजणी सुरू आहे