पहाडावरील धोकादायक वळणावर बस उलटली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ डिसेंबर २०२०

पहाडावरील धोकादायक वळणावर बस उलटली
आज दि.26/12/2020 रोजी सकाळी 11.20 वा. जीवती नगराळा गडचांदुर मार्गावर गडचांदुरकडे जाताना मानिकगड किल्ला जवळ नोकारी खु. पासून 1 किमी अंतरावर बस उलटली.
राजुरा आगरातील MH 12 EF 6979 बस पलटुन शाळेतील विद्यार्थिनी व वृद्ध महिला व प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. माणिकगड पहाडातील चढान व उतार हे धोकादायक असून व वळणाची रस्ता आहे. या अगोदर सुध्दा चढ असताना बस मागे येऊन बांबुच्या झाडाला लटकुन दरीत जाण्यापासून थांबली व मोठा अनर्थ टळला होता.