ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. नारायण तथा बाळ पुरोहित यांचे निधन bal purohit - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ डिसेंबर २०२०

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. नारायण तथा बाळ पुरोहित यांचे निधन bal purohitडॉ. बाळ पुरोहित यांच्या निधनाने ऋषितुल्य संगीतज्ञ गमावला - अमित विलासराव देशमुख


लातूर दि. २६ डिसें.
"नागपूर येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. नारायण तथा बाळ पुरोहित यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे", अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
" संगीताचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. उस्ताद अमीर खान साहेबांचा आणि त्यांच्या गायकीचा पुरोहित यांच्या गायकीवर मोठा प्रभाव होता, तसेच इतर घराण्यांच्या गायकीचा सुद्धा गाढा अभ्यास होता. गेल्या पन्नास वर्षांत मोठा शिष्य परिवार त्यांनी घडविला.
शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक,उत्तम गायक आणि ग्रंथकर्ते म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.