शोषित, वंचित समूहांच्या मूलभूत हक्कांसाठी, संविधानिक मार्गाने सातत्याने कार्यरत राहू हा उपस्थितांचा निर्धार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ डिसेंबर २०२०

शोषित, वंचित समूहांच्या मूलभूत हक्कांसाठी, संविधानिक मार्गाने सातत्याने कार्यरत राहू हा उपस्थितांचा निर्धार


महामानवास विनम्र अभिवादनजुन्नर /वार्ताहर
घोडेगाव (ता.आंबेगाव,पुणे) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

आ. आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र पुणे,अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) आंबेगाव यांच्या वतीने हे अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण सहाय्यक प्रकल्प अधिकारी, नवनाथ भवारी , आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे निरीक्षक योगेश खंदारे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शोषित वंचीत समूहांच्या संविधानिक हक्कांचा लढा ,संविधानिक मार्गाने सातत्यपूर्ण राहील हा विश्वास यावेळी किसान सभेचे राजू घोडे यांनी व्यक्त केला.

?तनवनाथ भवारी यांनी खावटी योजने विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी आदीम संस्थेचे,डॉ.अमोल वाघमारे,किसान सभेचे कॉ.राजू घोडे,अशोक पेकारी,लक्ष्मण जोशी,सुभाष भोकटे,अशोक जोशी
एस.एफ.आय.चे अविनाश गवारी,समीर गारे,अक्षय काळोखे, राहुल झगडे इ.उपस्थित होते.