पारंपारिक मिश्र व संजीवक शेतीकडे वाटचालीसाठी एक प्रयत्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ डिसेंबर २०२०

पारंपारिक मिश्र व संजीवक शेतीकडे वाटचालीसाठी एक प्रयत्नकडधान्ये बियाणे बँक भविष्यात विस्तारेल हा आशावाद

जुन्नर /आनंद कांबळे

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात वर्षानुवर्षे पारंपारिक व संजीवक शेती केली जाते.. भात या मुख्य पिकाबरोबरच नाचणी,वरई,सावा,व विविध प्रकारची कडधान्ये घेतली जात होती....
परंतु विविध कारणाने या शेतीचे प्रमुख पीक फक्त भात हेच राहिले व हळूहळू अनेक पिके करण्याचे प्रमाण कमी होत गेले..
या पार्श्वभूमीवर
किसान सभा आंबेगाव तालुका समिती,यांच्या पुढाकारातून व सोपेकॉम संस्था, पुणे यांच्या सहकार्याने व आदीम संस्था यांच्या संयोजनातून सुमारे 200 शेतकऱ्यांना कडधान्य बियाणे नुकतेच वाटप करण्यात आले.

बियाणे बँक असा हा उपक्रम आहे...
या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक कुटूंबाला हरभरा, तर काही कुटुंबाला मसूर तर काही कुटुंबाला काळे वटाणे असे प्रत्येकी 5 ते 6 kg बियाणे दिले गेले आहे...

हे बियाणे देशी बियाणे आहे....
आंबेगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी व जे रब्बीची शेती करतात अशा शेतकऱ्यांना हे बियाणे वाटप करण्यात आले...

हे बियाणं मोफत वाटप करण्यात आले.
पीक आल्यानंतर, उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल तर  बियाणे परत बियाणं बँकेत शेतकऱ्यांनी जमा करणे आहे...

पिकाचे नुकसान झाल्यास बियाणे शेतकरी परत करणार नाहीत... 
 बियाणं वाटप करताना शेतकरी गटांना प्राधान्य दिलेलं आहे...
या उपक्रमाच्या संयोजनात सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे,आदीम संस्थेचे अमोल वाघमारे,यांनी योग्य ते सहकार्य केले तर, किसान सभा तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, अशोक पेकारी,सुभाष भोकटे,अशोक जोशी, रामभाऊ भांगे,दत्ता गिरंगे यांनी स्थानिक पातळीवरचे संयोजन केले......

पुढील वर्षी पुन्हा 400 शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जाईल....असा हा उपक्रम दरवर्षी वाढवत नेला जाणार आहे...
या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो..