2021ची केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० डिसेंबर २०२०

2021ची केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी

ओबीसी आरक्षण बचाव परिषद
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नका

बल्लारपुर/बामणी (प्रतिनिधी) :
कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपुर तर्फे आयोजित ओबीसी आरक्षण बचाव परीषद आज (दि.20) ला स्थानिक बामणी येथील बालाजी हायस्कूल समोर निवलकर लॉन येथे संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष बबनराव फंड, उद्घाटक डॉ. बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष सुभाष ताजने, प्रमुख अतीथी डॉ. अशोक जिवतोडे, दिनेश चोखारे, सचिन राजुरकर, रणजित डवरे, प्रा. शरद वानखेडे, शकील पटेल, वैशालिताई बुद्दलवार कल्पना मानकर, योगिता लांडगे, विजय मालेकर, रमेश पीपरे, श्याम लेडे, गोविन्दा पोडे, आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने 2021 ची जनगणना करावी, व राज्याने सुद्धा करावी, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नका, विदर्भातील नऊ जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, यासह 21 मागण्यांसाठी ठराव पारीत करण्यात आला.प्रस्तावित सुरेश पंद्दीवार,संचालन गजानन चिंचोलकर, आभार प्रदर्शन राजेश बट्टे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गणपती मोरे,कार्तिक जीवतोडे,,दिवाकर झाडे, वैभव साळवे, ज्ञानेश देरकर, उमेश सपाटे,योगेश पोतराजे यांनी प्रयत्न केले