दोन गटात तुंबळ हाणामारी : बांधकाम ठेकेदारासह भाजपा पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्षावर गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ नोव्हेंबर २०२०

दोन गटात तुंबळ हाणामारी : बांधकाम ठेकेदारासह भाजपा पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्षावर गुन्हा दाखल
जुन्नर/वार्ताहर
जुन्नर शहरालगत असनाऱ्या पाडळी कबाडवाडी गावच्या हद्दीत जमिनीतुन जाणाऱ्या रस्त्याच्या वादावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हानामारीत संबधीत बांधकाम ठेकेदारासह जुन्नर शहर भाजपा अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षावर हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात झालेला प्रकार असा , पाडळी कबाडवाडी गावच्या हद्दीत वरसुबाई मंदीरासमोर असलेल्या परीसरात शेतजमीनीसाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू असताना झालेल्या हाणामारी प्रकरणी बांधकाम ठेकेदार संतोष कबाडी ,जुन्नर शहर भाजपा अध्यक्ष गणेश बुट्टे पाटील व  माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील यांच्या हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे .यात बुट्टे व कबाडी या दोनही कुटुंबियांनी परस्परविरोधी फिर्याद दीली आहे.   माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे यांचे या हाणामारीत दात तुटले असून दोन्ही गटातील अनेकांना डोक्यात व हाता पायांवर जबर मारहाण झाली आहे.या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील अनेकजण जखमी झाले आहेत.  

परस्पर विरोधी तक्रारीत एका बाजूला   बांधकाम ठेकेदार  संतोष कबाडीसह आशुतोष  कबाडी, प्रतिक  नलावडे, प्रणित  नलावडे, सुरेंद्र  कबाडी, अनिता कबाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजप शहर अध्यक्ष  गणेश  बुट्टे ,माजी उपनगराध्यक्ष    राजेंद्र बुट्टे यांच्या सह  आकाश बुट्टे, रोहन बुट्टे, रोहित बुट्टे, शैलेश बुट्टे, प्रल्हाद बुट्टे,  शरद बुट्टे,आप्पासाहेब  बुट्टे, प्रणीत  बुट्टे, सुमित्रा  बुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडळी कबाडवाडी येथे गट न ३९ मध्ये रस्त्याचे काम सुरू असताना  कबाडी व  त्यांचे  नातलग नलावडे यांनी कामास हरकत केली.तसेच  संतोष कबाडी याने ग्रामीण रुग्णालयात  पाहुन घेतो अशी धमकी दीली असल्याची फिर्याद बुट्टे यांनी दीली आहे. तर गट न ३९,४० मध्ये  रस्त्यासाठी माती उकरत असताना  पोक्लेन मशीन बंद केले म्हणुन बुट्टे  कुटुंबियांनी मारहाण केल्याची कबाडी यांची फिर्याद आहे