होय, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नागपुरात नातलग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ नोव्हेंबर २०२०

होय, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नागपुरात नातलग

नागपूर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले ‘जो बायडन’ यांचे नागपूरला नातलग असल्याची बातमी पुढे आली आणि चर्चांना फुटलेला आहे . पहिल्यांदा वाचून आश्चर्य आणि चुकीची माहिती असल्याचा भास होतो. मात्र हे खरे आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नातलग नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत.नागपूर येथे बायडन यांचे नातेवाईक गेल्या 120 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जो बायडन यांचे पूर्वज 1873 साली ब्रिटन येथून ईस्ट इंडिया कंपनी सोबत भारतात आले. तेव्हापासून ते नागपुरात राहतात. त्यापैकी लेस्ली बायडन यांनी जो बायडन यांना 1881 साली पहिल्यांदा पत्र पाठविले होते. दोघांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहारात त्यांनी त्यांच्या नातेवाइकांबाबत चर्चा केली होती. लेस्ली बायडन त्यांचे नातू नागपुरात राहतात. ते 1873 पासून येथे वास्तव्यास असल्याचे सांगतात. त्यापैकी सोनिया बायडन फ्रान्सिस यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत वरील बातमीला दुजोरा दिला.

सोनिया ह्या प्रसिद्ध मनोसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लेस्ली बायडन हे भारत लॉज येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांचा मृत्यू 1983 रोजी झाला. सोनिया बायडन यांचा भाऊ इयान बायडन हे सुद्धा नागपुरातच वास्तव्यास असून त्यांनी मर्चंट नेव्ह्यमध्ये कामं केलेलं आहे. यावेळी त्यांनी जो आणि लेस्ली यांच्यादरम्यान झालेल्या पत्रव्यव्हाराच्या प्रति देखील दाखविल्या. नागपुरात स्थायिक झालेल्या बायडन कुटुंबातील काही सदस्य मुंबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही वास्तव्यास आहेत.

2018 साली लेस्ली यांचे नातू डेविड यांच्या लग्नसमारंभासाठी हे सर्व बायडन कुटुंब एकत्र जमले होते. 2015 साली जो बायडन यांनी वॉशिंग्टन येथे आपल्या भाषणादरम्यान आपले पूर्वज भरतात राहतात असा उल्लेख केला होता. मात्र, जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हे कुटुंब प्रकाशझोतात आलं. जो बायडनला त्यांचा यशाबद्दल सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.