काटोल तालुक्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ नोव्हेंबर २०२०

काटोल तालुक्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू
आकडा 1300 पार करणार !
# मृत एकूण 37, उपचार घेणारे 52

काटोल : तालुक्यात बुधवारला सात 7 पॉझिटिव्ह मिळाले आहे. सोमवार पासून पॉझिटिव रुग्ण 14 , त्यानंतर मंगळवार 7 व आज बुधवारला सुद्धा 7 रुग्ण मिळाल्याने पोसिटीव्ह रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसत आहे. इतर तालुक्याचा विचार करता काटोल तालुक्यात रुग्ण संख्या कमी होणे गरजेचे आहे. शहरीभागासोबत ग्रामीण भागात पोसिटीव्ह प्रमाण जवळपासच आहे. बुधवारला काटोल शहरात सतलाम ले आऊट 2 तर खंते ले आऊट 1 असे तीन 3 तसेच ग्रामीण भागात मोहखेडी, रिधोरा, कचारीसावंगा, बेहालगोंदी प्रत्येकी 1 असे 4 रुग्ण मिळाल्याने शहर व ग्रामीण एकूण 7 पोसिटीव्ह निघाले असल्याचे डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले. तालुक्यात मृतकाचा प्रमाण 2 ने वाढल्याने एकूण 37 मृत, एकूण आतापर्यत पोसिटीव्ह1290, दुरुस्त1201 तर उपचार करीत असलेले 52 केस असल्याची माहिती वैधकीय सूत्रांनी दिली.