शहीद भूषणवर सोमवारला अंतिम संस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ नोव्हेंबर २०२०

शहीद भूषणवर सोमवारला अंतिम संस्कार

काटोल बाजारपेठ बंद राहणार

शहराचे मुख्य मार्गाने निघणार शहीद भूषणची शव यात्रा


गृह मंत्री अनिल देशमुख यांची उपस्थितीकाटोल - हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी पण नगरीत वातावरण अंत्यत शोकाकुल , शनिवारला लक्ष्मीपूजन झाले पण , फैलापुरा आजू बाजूचा तसा काटोल करांनी दिवाळी आनंदावर विरजण घातले.इतिहासात पहिली दिवाळी म्हणावी लागेल .गेल्या तीन दिवसांपासून शहीद भूषण याचा परिसर अतिशय शोकाकुल आहे. भेटणारी मंडळींचा ओघ सतत सुरू पण अतिशय शांतमय व त्याचे पालन सुद्धा करताना दिसून येत होते.शहीद भूषण याचा परिवारात आई मीरा, वडील रमेश मोलमजुरी करणारे, तर बहीण सरिता खाजगी कॉन्व्हेंट मध्ये नोकरीला,सध्या करोना मुळे जॉब बंदच आहे. भाऊ रोशन पदवीधर व पोलीस भरती करीता तयारी करीत आहे. संपूर्ण परिवाराची जबाबदारी शहीद भूषण वर होती . त्याचे परिवाराला पुढे नेण्याचे स्वप्न घटनेमुळे अधुरे राहले आहे. ###### आयु डी पी न प जागेत अंतिम संस्कार --- शहीद भूषण यांचा पार्थिव आज नागपूर विमान तळावर रविवार (आज) सायंकाळी 6 वाजता पोहचेले. तेथे कर्नल देसाई,, जिल्हा सैनिक कल्याण संघटना अध्यक्ष श्रीमती खरपकर , नागपूर ग्रा.पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींचे उपस्थिती होती. तेथून कामठी एम एच हॉस्पिटल येथे पार्थिव नेण्यात येऊन सोमवार दि 16 .ला काटोल येथे सकाळी 9 वाजता शहीद भूषण यांचे निवास परिसर न प भवन फैलापुरा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक संघटना कार्याध्यक्ष रत्नाकर ठाकरे यांनी दिली. या दरम्यान बाजार पेठ स्वयं बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला. सामाजिक , क्रीडा , महिला , आदी संघटना यात प्रामुख्याने सहभागी होणार असल्याची माहिती आहे. शहरात वातावरण शोकाकुल असून अंतिम यात्रा तार बाजार, डॉ आंबेडकर चौक अशी जाईल.