पदविधरांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध :- संदीप जोशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ नोव्हेंबर २०२०

पदविधरांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध :- संदीप जोशीसुजित भसारकर(पाथरी )
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि. 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पत्रकार भवन , सावली येथे कार्यकर्ता व मतदार संवाद मेळावा संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार.प्रा.अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत या संवाद मेळाव्याला उमेदवार मा.संदीप जोशी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.देवराव भोंगळे,जि.प. अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले, जिल्हा संघटन महामंत्री श्री. संजय गजपुरे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश भैया शर्मा भाजयुमो अध्यक्ष श्री आशिषजी देवतळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कु.अल्काताई आत्राम,संतोष तंगड़पल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी तालुक्यातील सर्व पदवीधर मतदार , कार्यकर्ते, पदाधिकारी या आयोजित मेळाव्यात बोलतांना जोशी म्हणाले की युवा मोर्चा च्या कार्यकर्त्ता असतांना पासून मि भाजपा मधे काम करित आहे.नागपुर महानगर पालिकेत 20 वर्षापासून निवडून येत आहे.जनतेचे काम करने हेच आपले लक्ष्य असून ते अवरित सुरु ठेवन्यासाठी आपला आशीर्वाद हवा आहे.पदविधारकांचे प्रश्न डोळ्यासमोर उभे आहेत ते सोडविन्यासाठी मि कटिबद्ध आहे.माझ्या कोणत्या संस्था नाही,शाळा महाविद्यालय नाही किव्हा डोनेशन साठी मि केव्हा पैसा घेत नाही.पदवीधर समजदार मतदार आहे ते याचा विचार करूनच मत आपल्या पदरात टाकतील असा विश्वास व्यक्त करित आपन 100 टक्के विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी इत्तर मान्यवरानी मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाल यांनी केले.संचालन कृष्णा राऊत तर आभार पूनम झाडे यांनी मानले.यावेळी भाजपा महामंत्री सतीश बोम्मावार,शहराध्यक्ष आशीष कार्लेकर,जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले,उपसभापती रविन्द्र बोलीवार,प्रकाश गड्डमवार, प्रकाश खजांची,अशोक आकुलवार,पस सदस्य छाया शेंडे,तुलसीदासजी कुनघाडकर,विनोद धोटे,किशोर वाकुड़कर,राकेश विरमलवार,गौरव संतोषवार, राकेश कोंडबतूनवार,मयूर व्यास,मयूर गुरुनुले,मनोज अम्ब्रोजवार,नामदेव झाडे,विशाल करन्डे,तुलसीदास भुरसे यांचा सह अन्य पदाधिकारी उपस्तित होते.