भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी भरला उमेदवारी अर्ज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ नोव्हेंबर २०२०

भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी भरला उमेदवारी अर्ज
नागपूर/ प्रतिनिधी
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला असून, यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपनी नवे चेहरे दिले आहेत. भाजपाचे उमेदवार महापौर संदीप जोशी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी संदीप जोशी यांनी मातोश्री चे आशीर्वाद घेतले, त्यांनी ओक्षवन केले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्याचेही आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. यावेळी भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार अनिल सोले, अध्यक्ष प्रवीणजी दटके सुलेखा कुंभारे यांच्यासह विभागातील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत नागपुर विभाग पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी नामांकन अर्ज भरले.