आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र पाथरी येथे नवीन रुग्णवाहिका उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ नोव्हेंबर २०२०

आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र पाथरी येथे नवीन रुग्णवाहिका उपलब्धमाजी सरपंच राजूभाऊ सिद्धम यांच्या प्रयत्नांना यश

सुजित भसारकर ,पाथरी-
कोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीत कमी वेळेत दवाखान्यात पोचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाइफ सपोर्ट ची पूर्ण व्यवथा असलेली 38 रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच नामदार विजयभाऊ वडेट्टीवार (मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर)यांच्या हस्ते झाले .रुग्णवाहिकेचे महत्व लक्षात घेऊन राजुभाऊ सिद्धम माजी सरपंच ,पाथरी यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र पाथरी येथे नवीन रुग्णवाहिका मिळावी यासाठी नामदार विजयभाऊ वडेट्टीवार (मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर) यांना रुग्णवाहिकेची मागणी केली होती.अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून काल दि.२४नोव्हेंबर2020ला आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र पाथरी येथे नवीन रुग्णवाहिका  उपलब्ध करून देण्यात आलीआहे.

 यामुळे पाथरी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.पाथरी परिसरातील सर्व नागरिकांनी विजयभाऊ वडेट्टीवार(मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ,चंद्रपूर)यांचे आभार व्यक्त केले आहे.याप्रसंगी माजी सरपंच राजुभाऊ सिद्धम ,रामू पाटील ठिकरे , आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र पाथरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कवळे साहेब ,डॉ. सायली शेंडे मॅडम, आरोग्य सहाय्यक डी. डी. भालेराव,मोहूर्ले साहेब ,नितीन सोरते, सतीश उंदिरवाडे, मोहित मेश्राम ,रोशन ठिकरे,वाहन चालक रवी अंबादे उपस्थित होते