दोन हजारासाठी युवकाचा खून ! विहिरीत सापडला मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ नोव्हेंबर २०२०

दोन हजारासाठी युवकाचा खून ! विहिरीत सापडला मृतदेह
काटोल : तालुक्यातील येरला (धोटे) शिवारात विहिरीत मृतक अमोल वासुदेव रक्षित ( वय32) रा पंचशील नगर रेल्वे स्टेशन परिसर यांचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. शेत परिसरात शेतकरी रवींद्र साठे यांचे शेतात मजूर विहिरीवर गेले असता तेथे दुर्गंधी येत होती . विहिरीत बघितले असता पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. काटोल पोलिसांना माहिती देण्यात आली .घटनेची हकीकत अशी मृतकावर आरोपी शंकर गणपतराव ढोके (35) रा उमरेड ह मु येरला (धोटे)याचे 2 हजार होते. त्यावरून त्याच्यात वाद झाला . वाद विकोपाला गेला त्याचे पर्यसन खुनात झाले. मृतक अमोल रक्षित 9 नोव्हेबरला सकाळी घरून बाहेर पडला होता.त्यानंतर त्याचा मृतदेहच सापडला. आरोपी शंकर ढोके याला अटक करण्यात आली असून भादवी 302 /201 अन्वेय गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती काटोल पोलिसातून मिळाली.तपास कार्य सुरू आहे.